Nalasopara Car Fire : नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! पार्किंग करून ठेवलेल्या पाच ते सहा कारने घेतला अचानक पेट

नालासोपारा पूर्वेतील सर्वोदय नगर, बावशेत पाडा परिसरात रविवारी दुपारी खुल्या मैदानात पार्किंग करून ठेवलेल्या अंदाजे पाच ते सहा चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली.

Nalasopara Car Fire : नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! पार्किंग करून ठेवलेल्या पाच ते सहा कारने घेतला अचानक पेट

नालासोपारा पूर्वेतील सर्वोदय नगर, बावशेत पाडा परिसरात रविवारी दुपारी खुल्या मैदानात पार्किंग करून ठेवलेल्या अंदाजे पाच ते सहा चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली. वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे  कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी  होजच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत कूलिंग पद्धतीने आग विझवली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. 

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही वाहनांचे नुकसान झाले आहे. आजचे वसई-विरार तापमान हे कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले होते. त्यामुळे गाड्यांना आग उष्णतेमुळे लागल्या का कुणी जाणून बुजून लावल्या याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number