Dadar Best Bus Accident : दादरच्या मार्केट परिसरात भीषण अपघात; बेस्ट बसने कारसह बाईकला उडवलं, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर येथील प्लाझा सिनेमाजवळ आज, सकाळी एक भीषण अपघात घडला. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसला हा अपघात झाला आहे. दादर येथील प्लाझा सिनेमा येथील कोतवाल उद्यानाजवळ एक बेस्ट बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, कोतवाल […]

Dadar Best Bus Accident : दादरच्या मार्केट परिसरात भीषण अपघात; बेस्ट बसने कारसह बाईकला उडवलं, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर येथील प्लाझा सिनेमाजवळ आज, सकाळी एक भीषण अपघात घडला. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसला हा अपघात झाला आहे. दादर येथील प्लाझा सिनेमा येथील कोतवाल उद्यानाजवळ एक बेस्ट बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, कोतवाल गार्डन परिसरातून पुढे जाणारी वाहतूक सध्या अत्यंत संथ गतीने सुरू आहे.  या अपघातात चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दादर पश्चिम येथील कोतवाल गार्डन चौकात हा अपघात झाला. बेस्ट बस आणि कारची एकमेकांना धडक बसली. बेस्ट बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने कार, बाईकला ही धडक दिल्याची माहिती आहे. आज सकाळी 9.15 ते 9.45 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Mumbai-Delhi Expressway: मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर भीषण दुर्घटना! एका चुकीमुळे तीन वाहनांची धडक, चार जणांचा जागीच मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number