फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मान्यवर आणि हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. राज्यभरात शपथविधीनंतर जल्लोषाचे वातावरण आहे. महायुतीच्या नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केलेच, पण […]

फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मान्यवर आणि हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

राज्यभरात शपथविधीनंतर जल्लोषाचे वातावरण आहे. महायुतीच्या नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केलेच, पण विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांचा गौरव करत पुढील पाच वर्ष राज्य सरकारच्या चांगल्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी फडणवीस यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची असल्याचे सांगत, त्यांच्या कामातून राज्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, ही मोठी जबाबदारी आहे. राज्याला पुढे नेण्यासाठी कटुता विसरून सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.”
फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होईल, असा विश्वास राज्यभरातून व्यक्त होत आहे. शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणाला नवा धडाका मिळेल, अशी अपेक्षा आहे. असं  अमृता फडणवीस माध्यमांसमोर म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number