Amit Shah Plane Landing : गृहमंत्र्यांच्या बंगाल दौऱ्याच्या सुरुवातीलाच विघ्न…, वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटामुळे विमानाचं लँडिंग….

एका नेत्याने सांगितले की, अमित शाह रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी दिल्लीहून रवाना झाले होते.

Amit Shah Plane Landing : गृहमंत्र्यांच्या बंगाल दौऱ्याच्या सुरुवातीलाच विघ्न…, वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटामुळे विमानाचं लँडिंग….

कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी उशिरा रात्री ते कोलकात्यात पोहोचले. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाच्या धावपट्टीवर उतरण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. कोलकाता आणि आसपासच्या भागात मध्यरात्री आलेल्या जोरदार वादळ-पावसामुळे विमानाला थेट उतरणे शक्य झाले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीहून निघालेल्या विशेष विमानाचे नियोजित आगमन रात्री 11 वाजून 46 मिनिटांनी होणे अपेक्षित होते. मात्र ‘काल बैसाखी’ (स्थानिक वादळ) च्या प्रभावामुळे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विमानाला नदिया आणि परगणा जिल्ह्यांच्या हवाई क्षेत्रात बराच वेळ घिरट्या घालाव्या लागल्या. अखेर जवळपास दोन तासांच्या विलंबानंतर विमान रात्री 1 वाजून 46 मिनिटांनी कोलकाता विमानतळावर उतरले.

विमानतळावर पोहोचल्यानंतर अमित शाह सुमारे रात्री दोन वाजता ताफ्यासह शहरातील रवाना झाले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य घटकातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे तिथे स्वागत केले. एका पक्ष नेत्याने सांगितले की, अमित शाह रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी दिल्लीहून रवाना झाले होते.

हेही वाचा: Marine Drive Road: मुंबईकरांची ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून सुटका; 'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह' प्रवासाला लागणार फक्त 5 मिनिटे, कधी पूर्ण होणार प्रकल्प?

याचदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही यापूर्वी अशाच हवामानाच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अंडालहून येताना त्यांच्या विमानाला वादळामुळे सुमारे एक तास कोलकाता विमानतळावर उतरण्यास विलंब झाला होता. हवामान सुधारल्यानंतरच विमान सुरक्षित उतरवण्यात आले होते.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 7 मे 2026 रोजी संपत असल्याने निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी 152 जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 142 जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार असून, राज्यात एकूण 294 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सुमारे 7.04 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे. 

हेही वाचा: Nirmala Sitharaman: निर्मला सीतारामन यांचा खुलासा! इंधन दर स्थिर राहणार, नागरिकांना दिलासा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number