संपूर्ण जगभर कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. इस्त्राइल पाठोपाठ आता अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे.
ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने कोरोना लस देण्यात येत आहे. विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे.
ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, त्या नागरिकांना मोठ्या गर्दीची ठिकाणे वगळता इतरत्र तोंडाला मास्क लावण्याची गरज नसेल. ज्या नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली नसेल ते नागरिकही काही परिस्थिती वगळता मास्कशिवाय बाहेर जाऊ शकतात.
संपादन: सिद्धी भरत पाटील