Ambadas Danve Vs Eknath Shinde: "मित्रपक्षात पळवापळवी सुरु आहे" महायुतीतील अंतर्गत कुरकोडींवरुन दानवेंचा शिंदेंना खोटक टोला

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल.

Ambadas Danve Vs Eknath Shinde: &quotमित्रपक्षात पळवापळवी सुरु आहे&quot महायुतीतील अंतर्गत कुरकोडींवरुन दानवेंचा शिंदेंना खोटक टोला

छत्रपती संभाजीनगर, विजय चिडे | उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. सध्या राज्यभरात सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना ते म्हणाले की, "स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावे अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रचंड इच्छा आहे. जिथे शक्य आहे. तिथे आम्ही प्रयत्न करीत आहोत. अनेकवर्ष निवडणुका प्रलंबित झाल्याने कार्यकर्त्यात उत्साह आहे. याची खबरदारी ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. ओबीसी मधून निवडून आलेल्या सदस्यांची सदस्यत्व रद्द झाले होते. ही निवडणूक आयोगाची चूक आहे. आज उद्या विषय येणार."

पार्थ पवारांवर बोलताना म्हणाले की, "ज्या पार्थ पवार यांचे शेअर्स ९९ टक्के आहे. त्याचा नाव येत नाही. सरकारी जमीन विकता येते का? रेडिरेकनर काढला होता का? मुद्रांक शुल्क लावला, आधीचा आणि तेवढाच मुद्रांक शुल्क भरावे लागेल. महाराष्ट्रात आणि देशात असाच न्याय सरकारने सर्वांना द्यावा..99 टक्केवाले करतील आणि बाकीचे अडकतील. जो पार्थ पवार यांना न्याय लावला तो इतराना लावावा. पार्थ पवार यांना का वाचवायचं तर सगळ्यांचे हात दगडाखाली आहे. चोर चोर भाई…" 

महायुतीत सध्या पक्षांतर्गत पक्षप्रवेश पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते आणि नेते भाजपमध्ये गेले आहे. महायुतीत सुरु असलेल्या पक्षांतर्गत प्रक्षप्रवेशावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, " भाजप शिवसेना दोघे सारखे आहे. ठाण्याचे पळविल्यावर शिंदेंना दुःख झाले आहे. महाराष्ट्रातील अनेकाना भाजपने घेतलेले आहे. डोंबिवली नंतर हा प्रकार घडलेला आहे. शिंदेंचे चिरंजीव यांच्या मतदार संघांतील घेतल्यानंतर हा प्रकार घडला. कागदी एकमतला काही महत्व नाही. एकमेकांची जिरवायची ही समोर आले आहे".
हेही वाचा – BJP vs Shivsena : सेना-भाजप वाद शिगेला! सुरुवात शिवसेनेने केली, आता तक्रार कशाला? फडणवीसांची थेट शिंदे गटाच्या मंत्र्यांना उत्तर

"याच भाजपने साधू संतावर हल्ला ला होता, म्हणून आगडोंब उठली होते. तुळजापूर मधील ड्रग्स मधील आरोपी यांचा उमेदवार होतो.. कुठे राष्ट्र, संस्कृती. आता राष्ट्र नाही फक्त व्यक्ती असे भाजपचे झाले आहे. शिंदेंचे मंत्री शिंदेंच्या  एकात नाही, ते फडणवीसांचा बॉस मानायला सुरुवात केली आहे. ते कोण आहेत हे दोघांना माहिती आहे. सरकारच्या कृपेने नवाब मलिक बाहेर आहेत, हेच देशद्रोही देशप्रेमी झालेले आहेत. देशद्रोहाचा देशप्रेमी होती, गुन्हेगाराचा संत होतो. अजितदादाना अडचणीत आणण्याचा हा एक प्रकार आहे. तिकिटासाठी राजू शिंदे आमच्याकडे आले होते. राजू शिंदे यांना भाजप मध्ये प्रवेश करायला 9 महिने झाले. राजस्थानचे राज्यपाल बगाडे यांच्या कृपेने त्यांचा प्रवेश झाला. शिवसेना म्हणणारे खूप आले. राजू शिंदे बच्चा आहे. नमक हरामी म्हणता याला". 

तसेच त्यांनी मनसे युती, डमी व मूळ अर्ज अर्जबाद संभ्रम, खंडपीठ याचिका यावर देखील भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, "अजून कोणतीही गोष्ट सुरू झाली नाही. जागा वाटप हा मुख्य नाही, एकत्र येणे महत्वाचं आहे. ते होईल. दुसरा फॉर्म भरता त्यावर सूचक दुसराच असले पाहिजे हा नियम अगोदरच आहे. अधिकाऱ्यांचा राज्य नाही जनतेचा राज्य आहे. मंत्रीच नाही. आमदार आणि खासदार यांच्या बैठकीत देखील जावे. शरद पवार यांची भेट घेत आहे. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी एकत्र येईल. कुणाचा मुलगा, भाऊ, बहीण चांगले असतील तर उमेदवारी द्यायला हरकत नाही. तो कार्यकर्ता असेल तर नातेवाईक म्हणून अन्याय होऊ नये. एका घरात 5 ते 6 तिकीट देणे योग्य नाही. ज्यात कॅलिबर आहे त्याला उमेदवारी दिली पाहिजे. आमची काही अडचण नाही पाच वर्ष एकमेकांबरोबर नीट वागा, नंदा सौख्य भरे…"

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number