Ambadas Danve on Bacchu Kadu Statement: ‘मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला अधिक पसंती’, बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर आंबादास दानवेंची प्रतिक्रिया समोर

सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Ambadas Danve on Bacchu Kadu Statement: ‘मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला अधिक पसंती’, बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर आंबादास दानवेंची प्रतिक्रिया समोर

बच्चू कडू यांनी  आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. त्यामुळे राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.  त्यांच्या या विधानामुळे राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, “महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला तरी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे”. 

हेही वाचा- LPG Gas Cylinder Price: हॉटेलमधील जेवण महागणार? व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; तर घरगुती LPG च्या किमतीत… 

यावरून आंबादास दानवे यांनीदेखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, बच्चू कडू आता शिंदे यांच्या गटात गेले आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी येऊ दे हे जर सांगायचं असेल तर त्यांनी शिंदे साहेबांना सांगितलं पाहिजे, शिंदे साहेब देवेंद्रजी यांना सांगतील त्यात विठ्ठलाकडे जायची काय गरज आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number