Maharashtra Politics : ठाकरेंचे दानवे महायुतीच्या गोटात? महायुतीचा ‘तो’ दावा खरा ठरणार? राजकीय वर्तुळात खळबळ

महायुतीतील काही नेत्यांकडून खासदारांनंतर आमदारही फुटणार असल्याचा दावा केला. या दाव्यानंतर मविआमध्ये खळबळ उडाली असून नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठी बातमी समोर येत आहे.

Maharashtra Politics : ठाकरेंचे दानवे महायुतीच्या गोटात? महायुतीचा ‘तो’ दावा खरा ठरणार? राजकीय वर्तुळात खळबळ

ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलं, ज्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसला. यानंतर महायुतीतील काही नेत्यांकडून खासदारांनंतर आमदारही फुटणार असल्याचा दावा केला. या दाव्यानंतर मविआमध्ये खळबळ उडाली असून नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी मविआऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिली आहे.

यंदा जिल्हा बँक निवडणुकीत 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन पॅनल झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत या निवडणुकीत 8 जण बिनविरोध संचालक झाले आहेत. बँकेच्या 21 संचालकपदांसाठी 120 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. त्यात 83 उमेदवारांनी माघार घेतली. एकूण 20 संचालकपदांसाठीच ही निवडणूक होत असून पैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

हेही वाचा- Maha Vikas Aghadi Meeting : 'आपण खरंच एकत्र आहोत का?', उद्धव ठाकरेंचा बैठकीत प्रश्न उपस्थित; प्रमुख नेत्यांसह या आमदारांची बैठकीला दांडी

तर दानवेंच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत 12 संचालकपदासाठी 31 उमेदवारांमध्ये लढाई होणार आहे. यात मंत्री अतुल सावे, कल्याण काळे, अनुराधा चव्हाण, अंबादास दानवे यांच्यासह 31 उमेदवार रिंगणात आहेत. तर नवनिर्वाचित आ. सुहास शिरसाट, किशोर शितोळे, राजू शिंदे, हर्षदा शिरसाट, निशांत पाटील, अर्जुन पाटील, एकनाथ जाधव, राजू भुमरे, रवींद्र संचेती, देवयानी डोणगावकर, श्रद्धा माने, प्रदीप शिंदे, गोकुळसिंग राजपूत, बाबुराव पवार, कविता घुगे यांच्यासह अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

विशेष म्हणजे मविआचे पॅनल बनले असतानाही अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर अंबादास दानवे यांच्या भूमिकेवर पक्षातील वरिष्ठ नेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दानवेंच्या भूमिकेमुळे ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध आलेले 8 संचालक 
1. संजय शिरसाट — शिवसेना शिंदे गट 
2. विलास भुमरे — शिवसेना शिंदे गट 
3. रमेश बोरणारे — शिवसेना शिंदे गट
4. अब्दुल समीर सत्तार — शिवसेना शिंदे गट 
5. अर्जुन गाढे — शिवसेना शिंदे गट 
6. संदीप निकम — भारतीय जनता पार्टी 
7. दिनेश परदेशी — भारतीय जनता पार्टी 
8. अनिल बोरसे — भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number