Maharashtra local body elections: नांदेडमध्ये नेमकं चाललंय काय? मतदानाच्या दिवशी पैशाचं आमिष देऊन हजारो मतदारांना ठेवलं कोंडून

नगरपालिकेच्या मतदानादरम्यान शेकडो मतदारांना एका ठिकाणी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Maharashtra local body elections: नांदेडमध्ये नेमकं चाललंय काय? मतदानाच्या दिवशी पैशाचं आमिष देऊन हजारो मतदारांना ठेवलं कोंडून

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच विविध ठिकाणी उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असतानाच, काही भागांत मात्र गंभीर प्रकार समोर आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची माहिती मिळत आहे. मतदान सुरू असतानाच एका आमदारावर आणि त्यांच्या समर्थकांवर मोठ्या संख्येने मतदारांना एका ठिकाणी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका मंगल कार्यालयात शेकडो मतदारांना एकत्र ठेवण्यात आल्याचे सांगितले जात असून, या मतदारांना आर्थिक आमिष दाखवून तिथेच थांबवण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारा हा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया राजकीय स्तरावर उमटत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधित आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, नेमके काय घडले याचा तपास केला जात आहे. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number