पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांची हकालपट्टी

शौर्य स्मारक उभारण्याच्या मुद्द्यावरुन सध्या पवार गटात नाराजीनाट्य सुरु असल्याचे समोर आले आहे. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या तातडीने रद्द केल्या आहेत. 

पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांची हकालपट्टी

मुंबई : शौर्य स्मारक उभारण्याच्या मुद्द्यावरुन सध्या पवार गटात नाराजीनाट्य सुरु असल्याचे समोर आले आहे. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या तातडीने रद्द केल्या आहेत. 

शरद पवार गटाचे नाराजीचे सत्र पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द केल्या आहेत. 23 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्धपत्रक काढत त्यांनी प्रवक्ता पदावरील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. तसेच नवीन प्रवक्ता पदावरी नियुक्त्या जाहीर करण्यात येतील असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा : पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

पानिपत येथे शौर्य स्मारक उभारण्याच्या मुद्द्यावर पवार गटात मतभेद निर्माण झाले आहेत. पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठ्यांच्या शौर्य स्मारकाला विरोध केला आहे. मात्र पवार गटाचे नेते महेश तपासे यांनी त्याविरोधात भूमिका घेतली. तपासे यांनी पत्रकार परिषद घेत आव्हाड यांचा मुद्दा खोडून काढला. महेश तपासे यांचे आजोबा गणपतराव तपासे हे यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. त्यांनी सर्वप्रथम पानिपत येथे शौर्य स्मारक उभारले आहे. त्याची आठवण महेश तपासे यांनी जितेंद्र आव्हाड यांना करून दिली. त्यानंतर दोनच दिवसात पवार गटाचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रवक्त्यांच्या नियुक्त्याच रद्द करून टाकल्या आहेत. यामुळे आता पवार गटाचा कुणीही अधिकृत प्रवक्ता उरलेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number