अर्थसंकल्प सादरीकरणात गुलाबी जॅकेट का नव्हते?अजित पवार यांचे स्पष्टीकरण

गुलाबी जॅकेटची चर्चा पुन्हा रंगली! अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत<br/>

अर्थसंकल्प सादरीकरणात गुलाबी जॅकेट का नव्हते?अजित पवार यांचे स्पष्टीकरण

अर्थसंकल्पाच्या उत्तरादरम्यान गुलाबी जॅकेट नक्की घालीन – अजित पवार

राज्याचा अर्थसंकल्प दिनांक १० मार्च २०२५ सोमवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने त्यांना अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का घातले नाही, असा प्रश्न  केला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेटबद्दल महत्त्वाची माहिती दिली.

अजित पवार यांनी याआधी अनेकदा गुलाबी जॅकेट घातले असून, त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली आहे. त्यांच्या या जॅकेटबद्दल माध्यमांमध्येही उत्सुकता असते. मात्र, अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले नाही. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, "अर्थसंकल्प सादर करताना कोणते जॅकेट घालावे, हा प्रश्न मलाही पडला होता. मागच्यावेळीही हेच जॅकेट परिधान केले होते. आता पुन्हा तेच घातले असते तर काहींना वाटले असते की, यांच्याकडे दुसरे जॅकेट आहे की नाही? नेहमी तेच वापरतो. त्यामुळे यावेळी ते परिधान केले नाही.

"काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

गुलाबी जॅकेटच्या चर्चेवर बोलताना त्यांनी पुढे म्हटले, "तुम्ही आता मला याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या उत्तरादरम्यान गुलाबी जॅकेट नक्की घालीन." त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अजित पवार आणि त्यांचे गुलाबी जॅकेट याबाबत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या या जॅकेटची वेगळी ओळख तयार झाली आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्पाच्या उत्तरादरम्यान ते गुलाबी जॅकेट घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number