अजित पवार यांचे कार्यक्रम रद्द

बुलढाणा, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: समृध्दी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा झालेला मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर राज्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य नसल्याने मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कृपया, माध्यमांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]

अजित पवार यांचे कार्यक्रम रद्द

बुलढाणा, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: समृध्दी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा झालेला मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर राज्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य नसल्याने मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कृपया, माध्यमांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवारांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले,
नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे.

समृध्दी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात २५ प्रवाशांचा झालेला मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर राज्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य नसल्याने मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कृपया, माध्यमांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number