रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न – नरेश म्हस्के

विरोधी पक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रयत्न केले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच, रोहित यांना निवडणुकीत […]

रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न – नरेश म्हस्के

विरोधी पक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रयत्न केले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच, रोहित यांना निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनी सर्वांना फोन केले असल्याचा दावाही नरेश म्हस्के यांनी केला आहे.

नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न पवारांनी केला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रोहित पवार आणि अभिषेक बोके हे रिंगणात उतरले होते. दरम्यान, या निवडणुकीत रोहित पवार यांनी क्लब वर्गातून जास्तीत जास्त मते मिळवली. मात्र, या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवारांनी फिल्डिंग लावली असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. म्हस्के म्हणाले,‘अजित पवार साहेब आधी आपलं बघा, नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी तुम्ही कोणाकोणाला फोन केले आणि निरोप दिले ते सांगा. आधी याची कल्पना द्या, नंतर आमच्यावर टीका करा, असे ते म्हणाले.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number