अजित पवार अवघडले, भगव्या शालूने झाकला ‘तो’ शब्द

अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. याआधी कार्यकर्त्यांनी भेट दिलेल्या नामफलकावरील एक शब्द झाकून नंतर अजित पवारांनी फोटो काढू दिला.

अजित पवार अवघडले, भगव्या शालूने झाकला ‘तो’ शब्द

बारामती : अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. याआधी सकाळी अजित पवार यांना कार्यकर्त्यांना भेट म्हणून भगवा शालू आणि एक नामफलक दिला. याप्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांनी फोटोसाठी अजित पवारांना नामफलकाची पट्टी दाखवण्याची विनंती केली. या विनंतीचा मान राखताना अजित पवारांनी त्यांच्या भगव्या शालूने नामफलकावरील एक शब्द झाकला. वारंवार विनंती करुनही अजित पवारांनी गरज नाही असे सांगत नामफलकावरील तो शब्द दिसणार नाही याची खबरदारी घेतली. 

काय होता नामफलकावरील 'तो' शब्द ?

कार्यकर्त्यांनी भेट म्हणून दिलेल्या नामफलकावर अजित पवारांच्या नावाखाली मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन असे नमूद होते. हा फलक बघितल्यावर अजित पवार अवघडले. त्यांनी फोटोची विनंती झाल्यावर नामफलक हाती घेतला. पण पाठीवरच्या भगव्या शालूने नामफलकावरील मुख्यमंत्री हा शब्द झाकला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number