‘वाचाळवीरांनो, मर्यादा पाळा’

लाडकी बहीण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्याच आमदारांना सुनावले.

‘वाचाळवीरांनो, मर्यादा पाळा’

बुलढाणा : लाडकी बहीण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्याच आमदारांना सुनावले. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अडचणीत आणणारी वक्तव्ये करू नका. वाचाळवीरांनो, मर्यादा पाळा. राग येणे स्वाभाविक आहे. पण बोलताना शब्द जपून वापरा; असे अजित पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदार संजय गायकवाड यांनी परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्ये करणाऱ्या राहुल यांची जीभ छाटून आणण्यास ११ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ‘वाचाळवीरांनो, मर्यादा पाळा’, असे सुनावले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number