अजित पवार भाजपासोबत कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; संजय राऊतांची प्रतिक्रिया

अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अजित पवार भाजपासोबत कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई: सध्या, महायुती सरकारमध्ये मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे, दोन्ही नेते एकमेकांच्या कार्यक्रमांना जाण्यास टाळत आहेत. यादरम्यान, अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यासोबतच, काका पुतण्या म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा: विनायक राऊतांची अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर

काय म्हणाले संजय राऊत?

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले होते. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांना महाविकास आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. याबद्दल, खासदार संजय राऊत म्हणाले की, 'अजित पवार हा शरद पवार यांचा विषय आहे. पवार साहेब आणि ते भेटतात. त्यांचे काही संस्थापक कार्यक्रम होत असतात. पण राजकीयदृष्ट्या म्हटलं तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाही'.

हेही वाचा: गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश; चौकशीला सुरूवात

पुढे संजय राऊत म्हणाले की, 'अमित शाहांनी अजित पवारांना हाताशी धरून पक्ष फोडला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजप बरोबर राहून कदापी मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हायला लागेल. आमचं देखील कुटुंब आहे ठाकरेंचं पण आमच्या स्वभावात त्यांच्या स्वभावात फरक आहे'. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number