Raosaheb Danve: मोदींचा ‘तो’ शब्द, पवारांची अट, पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग तीनवेळा; दानवेंकडून मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्या निधनानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या मोठ्या खुलास्यामुळे राज्याच्या सत्ताकारणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Raosaheb Danve: मोदींचा ‘तो’ शब्द, पवारांची अट, पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग तीनवेळा; दानवेंकडून मोठा गौप्यस्फोट

मुंबई: अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा पसरलेली असतानाच, आता एका मोठ्या राजकीय खुलास्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील पडद्यामागील घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

रावसाहेब दानवे यांनी दावा केला आहे की अजित पवार यांनी एकदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा शपथविधी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या काळातील सत्तास्थापनेचे प्रयत्न आणि अपयशी ठरलेले राजकीय प्रयोग पुन्हा समोर आले आहेत. दानवे यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो प्रयोग यशस्वी ठरला नाही.

यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार, याबाबत जवळपास सर्व निश्चित झाले होते, असेही दानवे यांनी सांगितले. मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला सरकारमध्ये सोबत न घेता भाजप आणि राष्ट्रवादीने मिळून पुढे जाण्याचा सल्ला दिल्याचा अंतर्गत खुलासा त्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या अटींमुळे  दुसरा सत्तास्थापनेचा प्रयत्नही फसला, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाण्यासाठी करावी लागणार कसरत, ‘या’ भागात 10 दिवस असणार पाणीटंचाई

दानवे यांच्या वक्तव्यानुसार, दुसरा प्रयोग अयशस्वी ठरल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला आणि त्या वेळी भाजप राष्ट्रवादीचे (अजित पवार गट)  सरकार स्थापन झाल्याचा दावा करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत घडलेल्या घडामोडी आजवर अधिकृतपणे समोर आलेल्या नव्हत्या, त्यामुळे या खुलास्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या “गोप्यस्फोटा”मुळे राज्यातील सत्ताकारणावरील चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजपमधील इतर नेते किंवा मंत्रीही आता अशाच प्रकारचे अंतर्गत खुलासे करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वक्तव्यावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतात, हेही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे.

एकीकडे अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न असताना, दुसरीकडे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णायक क्षणांबाबत होणारे हे खुलासे राज्याच्या राजकारणाला नवे वळण देणार का,हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

हेही वाचा: Maharashtra Cabinet Reshuffle: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी; मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number