मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी आतापर्यंत एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. विविध राजकीय समीकरणे आणि सरकारांच्या कार्यकाळात त्यांनी हे पद भूषवले.
दोन वेळा – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात
दोन वेळा –- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात
एक वेळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात
एक वेळा – -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात
दीर्घ अनुभव, प्रशासकीय पकड आणि आक्रमक निर्णयशैलीमुळे अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.