…यामुळे अजित दादांबद्दलचा आदर अधिक वाढलाय – धनंजय मुंडे यांचे ट्विट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ईडीत जाणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यातच अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, माझ्यावर होणाऱ्या ईडीच्या कारवाईमुळे अस्वस्थतेतून अजित पवार यांनी राजीनामा […]

…यामुळे अजित दादांबद्दलचा आदर अधिक वाढलाय –  धनंजय मुंडे यांचे ट्विट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ईडीत जाणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यातच अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, माझ्यावर होणाऱ्या ईडीच्या कारवाईमुळे अस्वस्थतेतून अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार मात्र या संपूर्ण काळात अज्ञातवासात होते.

शनिवारी अजित पवार जनतेसमोर आले, पत्रकार परिषद घेत त्यांनी राजीनाम्याचं कारण स्पष्ट केले आहे. यावेळी धनंजय मुंडे,छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील देखील उपस्थित होते.या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार  हे भावनिक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार असे म्हणाले, मी काल राजीनामा अचानक दिला, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना व सहकाऱ्यांना वेदना झाल्या. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकाऱ्यांना विचारले असते तर त्यांनी राजीनामा देऊ नये असा त्यांचा पवित्रा असता. यासाठी त्यांची माफी मागतो. यानंतर धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्विट केले असून, त्यांनी असे सांगितले की,

अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात भावनिक व्यक्तीमत्व. सूडाच्या राजकारणाने आदरणीय पवार साहेबांना प्रचंड वेदना झाल्या. काकांना झालेला त्रास दादांना सहन न झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दादांच्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढलाय. असं ते ट्विट मध्ये म्हणाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number