बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया सोमवार (23 जून) रोजी सकाळी 9 वाजता सुरू झाली असून, ती अद्याप सुरूच आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण दोन फेऱ्यांपैकी पहिली फेरी रात्री 9 वाजेपर्यंत पूर्ण होईल. दुसरी फेरी रात्री 10 वाजल्यापासून सुरू होणार असून, निकाल पहाटे 5 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर असून, त्यांचे तीन पुरुष उमेदवार आणि एक महिला उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, चंद्रराव तावरे यांच्या पॅनलची एक महिला उमेदवार आघाडीवर आहे.
भोसले रत्नकुमार साहेबराव – 4117 (आघाडीवर)
गायकवाड बाबुराव अप्पा – 3717
भोसले राजू श्रीरंग – 417
सातपुते प्रताप पांडुरंग – 50
भोसले अर्जुन सीताराम – 15
शेंडे नितीन वामनराव – 4120 (आघाडीवर)
नारळी रामचंद्र कोंडीबा – 3644
बनकर भरत दत्तात्रय – 437
बनसोडे अरविंद भीमदेव – 152
विलास ऋषिकांत देवकाते (अजित पवार गट) – 4269 (आघाडीवर)
सूर्याजी तात्यासो देवकाते (तावरे गट) – 3288
ज्ञानदेव बुरुंगले (शरद पवार गट – तुतारी) – 566
भुते बाळासो रामचंद्र – 66
देवकाते अनिकेत अजितकुमार – 24
देवकाते आबासो पांडुरंग – 61
संगीता बाळासाहेब कोकरे (अजित पवार गट) – 2161
राजश्री कोकरे बाबुराव (तावरे गट) – 2022
मुलमुळे ज्योती मच्छिंद्रनाथ (अजित पवार गट) – 1959
गावडे सुमन कृषिराम – 1545
निगडे प्रमिला पोपट – 199
तावडे पुष्पा मोहनराव – 156
कोकरे शकुंतला शिवाजी – 461
कोकरे संगीता भारत – 46
कोकरे संगीता दत्तात्रय – 53
अजित अनंतराव पवार – 91 (विजयी)
देवकाते भालचंद्र बाबुराव – 10
अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून, बहुतेक मतदारसंघांमध्ये त्यांच्या उमेदवारांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. अंतिम निकाल पहाटेपर्यंत येण्याची शक्यता असून, कारखान्याच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.