Ajit Pawar: बैलाला साखळी घातल्यासारखं पुरुषांनी गळ्यात सोन्याची चैन घालू नये, ज्वेलर्सच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या कानपिचक्या

सोन्याचे दागिने घालणे हे स्त्रियांनाच शोभून दिसते. नाहीतर गळ्यात सोन्याच्या जाडजूड चैन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.  

Ajit Pawar: बैलाला साखळी घातल्यासारखं पुरुषांनी गळ्यात सोन्याची चैन घालू नये, ज्वेलर्सच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या कानपिचक्या

मुंबई: सोन्याचे दागिने घालणे हे स्त्रियांनाच शोभून दिसते. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये. नाहीतर गळ्यात सोन्याच्या जाडजूड चैन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.  ते आज 29 सप्टेंबर रोजी चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

आपल्याकडे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यत सोने परिधान करण्याचे वेड आहे. सुरवातीपासून आपल्या परिसरात ही परंपरा चालत आली आहे. आधुनिक काळात लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. लोकांची सोनं खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे लोक प्रत्येकवेळी सणासुदीला सोन्याची खरेदी करतात. सोनं अडचणीच्या वेळी बँकेत गहाण ठेवता येतं. त्यामुळे नड भागवता येते.

हेही वाचा: Sharad Pawar : अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; शरद पवारांच्या राज्य सरकारकडे 'या' मागण्या

आपल्या भागात काही लोकांची गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडे शिवले होते. पण हे अती होत आहे. माझं पुरुष मंडळींना आणि तरुणांना एवढंच सांगणं आहे की, सोनं हे आपल्या आईच्या, पत्नीच्या, बहिणीच्या आणि मुलीच्या अंगावर शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्यामुळे पुरुषांनी त्या भानगडीत पडू नका. उगाचच आपण बैलाला गळ्यात साखळी घालतो, तशाप्रकारच्या सोन्याच्या साखळ्या घालून अनेकजण समोर येतात. हे सगळं ते त्यांच्या पैशाने करतात. परंतु सोन्याकडे आपण घरातले स्त्रीधन म्हणून बघतो, त्यांना दिलं तर जास्त चांगलं होईल, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number