Ajit Pawar Last Rites : दादांच्या अंत्ययात्रेला लोटला जनसागर, LIVE UPDATES

अजित पवार अंत्ययात्रा

Ajit Pawar Last Rites :  दादांच्या अंत्ययात्रेला लोटला जनसागर, LIVE UPDATES

– अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांच्या पुत्र जय पवार यांच्या हस्ते मुखाग्नी देण्यात आला. 

– विजयकुमारे गोरे, संजय राठोड, रितेश देशमुख, राजेंद्र गवई, रामदास आठवले,गणेश नाईक, पंकजा मुंडे, यांच्याकडून अजित पवार यांना श्रद्धांजली 

– छगन भुजबळ यांनी घेतली अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन. आजारी असलेले   छगन भुजबळ यांनी आधार घेत अंतिम दर्शनासाठी आले. 

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

– अमित शाहांकडून अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण

– कार्यकर्त्यांसह कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी 

– नेत्यांनी घेतलं अजित पवारांचे घेतले अखेरचे दर्शन

– घरातील मंडळींनी अजित पवारांचे घेतले अखेरचे दर्शन

– अमित शाहांकडून शरद पवारांचे सांत्वन

– अजित पवारांच्या पार्थिवावर पार्थ आणि जय पवार यांच्या हस्ते अंत्यविधी

– अजित पवारांच्या अंत्यविधीला सुरूवात 

– पोलीस बॅंड पथकाकडून अजित पवारांना मानवंदना 

– अजित पवार यांची अंत्ययात्रा बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचली 

– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामतीत दाखल,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन नबीन बारामतीत दाखल 

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्या प्रतिष्ठानात दाखल 

– राज ठाकरे आणि रितेश देशमुख विद्या प्रतिष्ठान येथे दाखल 

– पुढील दहा ते पंधरा मिनिटात अजित पवार यांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जाईल

– 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार 

– शरद पवारांना पाहून सर्व निशब्द 

– अजितदादा तिरंग्यात विसावले, पोलीस दलाकडून शेवटची सलामी

– अजित पवार यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्यांची मोठी बघायला मिळत आहे. अनेक मोठे नेतेही काटेवाडीत पोहोचले आहेत.

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, पुणे विमानतळावरून बारामतीकडे रवाना

– धीरज देशमुख आणि रितेश देशमुख बारामतीच्या काटेवाडीत पोहोचले आहेत.

– काटेवाडी येथे अजित पवार यांना मानवंदना देण्यात आली असून अजित पवार यांचे पार्थिव आता विद्या प्रतिष्ठान कडे निघत आहेत

– चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर विद्या प्रतिष्ठानात दाखल  

– पार्थ पवार आणि जय पवार या दोघांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला

– 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number