Ajit Pawar Last Call: “किरण, मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय…" अपघातापूर्वी दादांनी मित्राजवळ केलं होतं मन मोकळं

गेल्या काही दिवसांपासून नेहमीच 'ॲक्शन मोड'मध्ये राहणारे अजितदादा काहीसे शांत आणि व्यथित होते.

Ajit Pawar Last Call: “किरण, मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय…&quot अपघातापूर्वी दादांनी मित्राजवळ केलं होतं मन मोकळं

बारामती:  महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता निखारा, प्रशासनावर पोलादी पकड असणारा लोकनेता आणि लाडके 'दादा' म्हणजेच अजित पवार यांचा बारामतीतील भीषण विमान अपघातात अंत झाला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, एका कर्तृत्ववान पर्वाचा असा करुण अंत होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणी केली नव्हती.

मनातील ती सल आणि शेवटची अस्वस्थता

गेल्या काही दिवसांपासून नेहमीच 'ॲक्शन मोड'मध्ये राहणारे अजितदादा काहीसे शांत आणि व्यथित होते. अपघाताच्या पाच दिवस आधीच त्यांनी जिवलग मित्र किरण गुजर यांच्यापाशी मनातील खदखद बोलून दाखवली होती. “किरण, मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय, आता बस्स झालं असं वाटतंय,” हे त्यांचे शब्द आज काळजात घर करून राहतात. लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि त्यानंतर झालेली वैयक्तिक टीका यामुळे दादांचे मन आतून कुठेतरी तुटले होते.

हेही वाचा: Ajit Pawar Funeral: "पवार साहेब, तुम्ही बसा…; शरद पवारांना राज ठाकरेंचा आधार, नेमकं काय घडलं?

किरण गुजर यांनी डोळ्यांत पाणी आणून त्या दिवसाची आठवण सांगितली. त्या दिवशी दादांना कोणाशीही बोलायची इच्छा नव्हती. दोघांनी सोबत जेवण केले. दादा सतत विचारत होते, “रात्रंदिवस मेहनत करूनही माझ्याच नशिबी गालबोट का? बारामतीकर माझ्यावर का रागावले आहेत? मी कोणाचे काय वाईट केले?” एक कणखर नेता आतून किती हळवा आणि संवेदनशील असू शकतो, याचा प्रत्यय त्यांच्या या प्रश्नांमधून येत होता.

शेवटचा फोन आणि तो दुर्दैवी क्षण

अपघाताच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी अजितदादांनी गुजर यांना फोन केला होता. “मी विमानात बसलो आहे ,” हे त्यांचे शब्द शेवटचे ठरले. गुजर त्यांना घेण्यासाठी विमानतळावर उभे होते, पण काळाला काही वेगळेच मंजूर होते. त्यांच्या डोळ्यांदेखत विमानाचा भीषण अपघात झाला आणि धुराचे लोट आकाशात उसळले. गाडीत मृतदेह ठेवतानाचा तो क्षण आठवताना आजही बारामतीकरांचा कंठ दाटून येत आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Viral Post: ‘जर आपले विमान किंवा हेलिकॉप्टर सुरळीतपणे…’ अजित पवारांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता; दादांची 2024 मधली 'ती' पोस्ट पुन्हा चर्चेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number