प्रकृतीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे.

प्रकृतीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द

नाशिक : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना आमदार सरोज अहिर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर भाषणादरम्यानच प्रकृती अस्वस्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरही तब्येत खालावल्याने त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करत पुण्याकडे प्रयाण केले.

अजित पवार यांना घशाचा संसर्ग झाल्याने रविवारी दुपारपासूनच त्रास जाणवत होता. नियोजित दौऱ्यानुसार ते नाशिकमध्ये दाखल झाले आणि आमदार सरोज अहिर यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, नाशिकच्या उन्हामुळे आणि तापामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्रास कायम राहिल्याने पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांनी पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला.

भाषणादरम्यान अजित पवार यांनी स्वतःची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. 'मी आत्ताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेतली आहेत, पण तरीही बरं वाटत नाही, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही,' असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. 1992 पासून स्वच्छ कामगिरी केली असून, माझ्यावर आरोप झाले तरी मी राजीनामा दिला होता. जनतेने आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number