‘भाकरी मातोश्रीची आणि चाकरी शरद पवारांची’

अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची जीभ घसरली. आमच्या मंतावर निवडून आलेले महागद्दार भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात, असे वक्तव्य दादा भुसे यांनी विधानसभेत केले. दादा भुसेंच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले […]

‘भाकरी मातोश्रीची आणि चाकरी शरद पवारांची’

अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची जीभ घसरली. आमच्या मंतावर निवडून आलेले महागद्दार भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात, असे वक्तव्य दादा भुसे यांनी विधानसभेत केले. दादा भुसेंच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले असून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले.

मंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्यामुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. दादा भुसे आणि अजित पवार यांच्यात खडांजगी पाहायला मिळाली. दादा भुसेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार संतापले. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, दादा भुसेंनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करण्याचा काहीही संबंध नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही शरद पवारांबद्दलचे वक्तव्य सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे दाद भुसेंनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी नेत्यांच्या संतापानंतर पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही, असे वक्तव्य दादा भुसे यांनी केले. यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आवाज उठवला. विधानसभेतील वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये दाखवली जातात. त्यामुळे दादा भुसेंनी पवारांचा केलेला एकरी उल्लेख कामकाजातून काढून टाकवं, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

यावर, शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई यांच्याकडून दादा भुसेंची पाठराखण करण्यात आली. शंभुराज देसाई म्हणाले, शरद पवारांबद्दल कुठलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. शरद पवारांबद्दल महाराष्ट्राला आणि देशाला आदर आहे. त्यांनी राज्याचं नेतृत्व देशात केलं आहे. तसेच संजय राऊत आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यामुळे राऊतांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावं, असे शंभुराज देसाई म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number