Ajit Pawar : ‘या वस्तू तशाच राहिल्या पाहिजे’ अशा दिल्या होत्या अजित दादांनी सूचना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. बारामतीत आज त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून वातावरण अतिशय भावूक झाले आहे.

Ajit Pawar : ‘या वस्तू तशाच राहिल्या पाहिजे’ अशा दिल्या होत्या अजित दादांनी सूचना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. बारामतीत आज त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून वातावरण अतिशय भावूक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांना निरोप देण्यासठी त्यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देश–राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. काल 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर काल अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात रात्री 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज, गुरुवारी सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number