Ajit Pawar Passed Away: धक्कादायक! बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले.

Ajit Pawar Passed Away: धक्कादायक! बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

Ajit Pawar: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे.

पुण्यातून बारामतीकडे रवाना झालेले अजित पवार आज निवडणूक सभेसाठी जाणार होते. मात्र या दुर्दैवी घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती.

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number