Ajit Pawar Death: अजित पवार यांची सदैव आठवण राहील! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भावनिक श्रद्धांजली

बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Ajit Pawar Death: अजित पवार यांची सदैव आठवण राहील!  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भावनिक श्रद्धांजली

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात असून, सर्व स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भावनिक श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी लिहले आहे 

महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्यासह अनेक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. श्री. अजित पवार यांचे असामयिक निधन ही महाराष्ट्रासाठी अपूरणीय हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकारी क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांची सदैव आठवण राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, समर्थकांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मी मनापासून शोकसंवेदना व्यक्त करते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्वांच्या कुटुंबीयांनाही हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो. 

हेही वाचा: Eknath Shinde on Ajit Pawar Death: ‘निर्भय, स्पष्टवक्ते आणि प्रशासनावर मजबूत पकड’; एकनाथ शिंदेंची अजित पवारांना भावनिक श्रद्धांजली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number