Rupali Thombare: ‘ट्रॅफिकचं कारण आणि पायलट बदलण्याचा निर्णय…’, अजित पवारांच्या मृत्यूबाबत रूपाली ठोंबरे यांनी उपस्थित केले प्रश्न

या घटनेमागील सत्य, सेफ्टी प्रक्रियेतील त्रुटी आणि संशयास्पद बाबींची सखोल व पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Rupali Thombare: ‘ट्रॅफिकचं कारण आणि पायलट बदलण्याचा निर्णय…’, अजित पवारांच्या मृत्यूबाबत रूपाली ठोंबरे यांनी उपस्थित केले प्रश्न

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली असून, या घटनेने आपण पूर्णतः बधिर झाल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेमागील सत्य, संपूर्ण तपशील आणि पारदर्शक चौकशी जगासमोर येणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रूपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कसे झाले, का झाले, काहीच कळत नाही. देवाने लाखो लोकांचे पोशिंदे असलेले नेतृत्व आमच्यासारखे सहज नेण्याचे नव्हते. हे अत्यंत अघटित घडले आहे. आता जे घडले त्याचे सत्य समोर येणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

हेही वाचा: Budget 2026 Updates: पदवीसोबतच आता ‘यूट्यूबर’ होण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 500 महाविद्यालयांमध्ये सुरू होणार हाय-टेक लॅब्स

या घटनेबाबत उपस्थित होणाऱ्या अनेक अनुत्तरित प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. नियोजित फ्लाइट सकाळी 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश हे दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा कसा काय झाला? दोघांनाही एकाच वेळी उशीर होणे, अचानक पायलट बदलण्याचा निर्णय आणि त्यानंतर पाळण्यात आलेल्या सेफ्टी प्रक्रियेबाबत सविस्तर व अधिकृत माहिती अद्याप सार्वजनिक का करण्यात आलेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“या प्रकरणात नेमके काय घडले, हा केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे. राहून राहून मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय व सामाजिक पोकळीवर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात असून, या घटनेच्या चौकशीबाबत आता जनतेतूनही पारदर्शकतेची मागणी वाढताना दिसत आहे. 

हेही वाचा: Stock Market Crash: एक घोषणा आणि शेअर मार्केट गडगडला! सेन्सेक्स 2,400 अंकांनी कोसळला तर निफ्टी…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number