दादांनी पवारांचा निर्णय ठरवला चुकीचा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय चुकीचा ठरवला आहे. २००४मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती. त्यावेळी संधी घेतली असती तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात केलं आहे. चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहातर्फे दिलखुलास दादा या मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य […]

दादांनी पवारांचा निर्णय ठरवला चुकीचा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय चुकीचा ठरवला आहे. २००४मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती. त्यावेळी संधी घेतली असती तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात केलं आहे. चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहातर्फे दिलखुलास दादा या मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, ‘२००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती, पण राजकीय जीवनात काम करत असताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. २००४मध्ये राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी होती, तेव्हा राष्ट्रवादीच्या ७१ जागा तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. तर, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल अशी मानसिकता काँग्रेसने केली होती, असे अजित पवार म्हणाले. मात्र, पक्षाची शिस्त पाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर घेतलेले निर्णय ऐकावे लागताता, असे पवार म्हणाले.’

‘दिल्लीतून वरिष्ठांकडून निरोप आला की, राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री पद राहणार आहे. विधिमंडळाचा नेता म्हणून राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांची निवड केली होती. त्यामुळे संधी घेतली असती तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते, असे अजित पवार म्हणाले. परंतु, आम्हाला संधी मिळाली नाही. अखेर प्रयत्न करणं आपलं का असतं आणि जनतेचा कौल देणं हे मतदाराचं काम असतं. पण त्यानंतर प्रत्येकवेळी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेसच्या जागा जास्त आल्या त्यामुळे उपमुख्यमंत्री पद आमच्याकडं येत गेलं, असे अजित पवार म्हणाले.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number