अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मिश्किल टोलेबाजी

दादा म्हणाले, मै रुकनेवाला नहीं, शपथ घेणारच, शिंदे म्हणाले, त्यांना सकाळ-संध्याकाळच्या शपथेचा अनुभव...

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मिश्किल टोलेबाजी

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्या नजरा मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यावर लागल्या होत्या. अखेर अफाट श्रमानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड केली. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हजर होते. या पत्रकार परिषदे दरम्यान एकनाथ शिंदे यांना एक प्रश्न विचारण्यात आला की मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का ? या प्रश्नाचे उत्तर देत शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय…संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल. हे बोलणं झाल्यावर अजित पवार म्हणाले संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकनेवाला नहीं, मी तर शपथ घेणारच आहे.. अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, दादांना अनुभव आहे..सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा… त्यानंतर या विधानांमुळे पत्रकार परिषदेमध्ये काही क्षणासाठी सगळे खळखळून हसले.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यात दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. असं असलं तरीही मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सामील होणार की नाही ?  हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, महायुतीच्या पत्रकार परिषदेमधील शिंदेंच्याच वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलंय. त्याचबरोबर, उदय सामंत आणि  देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे, त्यांनी पुन्हा सरकारमध्ये राहावं अश्या इच्छा व्यक्त केल्या होत्या आता या इच्छेची पूर्तता एकनाथ शिंदे करणार का यावर सगळ्यांच्या नजरा आहेत.  त्यातच याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक मिश्किल टोलेबाजी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number