Ajit Pawar Plane Crash: अजित दादांचा मृत्यू की घातपात? राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CBI चौकशीची केली आग्रही मागणी

हा मृत्यू केवळ 'अपघात' नसून त्यामागे काही 'घातपात' तर नाही ना? याची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन CBI चौकशीचे निवेदन दिले आहे.<br/>

Ajit Pawar Plane Crash: अजित दादांचा मृत्यू की घातपात? राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CBI चौकशीची केली आग्रही मागणी

Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, आता त्यांच्या मृत्यूच्या कारणावरून संशयाचे धुके गडद झाले आहे. हा मृत्यू केवळ 'अपघात' नसून त्यामागे काही 'घातपात' तर नाही ना? याची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन CBI चौकशीचे निवेदन दिले आहे.

सुनित्रा पवारांच्या खांद्यावर दुहेरी जबाबदारी
अजित दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असून, पुढील आठवड्यात त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रेही हाती घेणार आहेत. एकीकडे सत्तेचे कामकाज आणि दुसरीकडे पक्षबांधणी अशा दोन्ही आघाड्यांवर त्या सक्रिय झाल्या आहेत.

CBI चौकशीसाठी 'चर्चगेट ते दिल्ली' हालचाली
आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अजित पवारांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून सीबीआय चौकशीची विनंती करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा – Rupali Thombre : 'अजित पवार यांचा घात की अपघात, पुरावे मागतोय…'; रुपाली ठोंबरे नक्की कोणावर संतापल्या?

भाजप-राष्ट्रवादी युतीचा नवा फॉर्म्युला?
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. आगामी काळात अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.

भ्रष्टाचारावर तटकरेंचा प्रहार
दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणावर बोलताना तटकरे आक्रमक झाले. 'मंत्री कार्यालयातील कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. तसेच अजित दादांच्या निधनानंतर घाईघाईने मंजूर केलेल्या 75 शाळांच्या फाईल्स आणि अल्पसंख्याक विभागातील कथित गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number