Ajay Munde On Suresh Dhas: भाजपा आमदार सुरेश यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर टीका केली होती. धनंजय मुंडे यांच्या आई त्यांच्यासोबत राहत नसल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. परंतु, आता या सर्वांवर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला आहे. अजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, 'कुठलेही कारण नसताना आमच्या मुंडे कुटुंबाची बदनामी केली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या परळी येथील घराचे काम सुरू असल्याने त्यांची आई मूळ गावी राहते. ज्या- ज्या वेळी धनंजय मुंडे परळीत येतात त्या वेळी ते देखील मुक्कामासाठी त्यांच्या आईकडे म्हणजेच मूळ गावी राहतात. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असं अजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
खोक्या प्रकरणात सुरेश धस यांना सहआरोपी करा – अजय मुंडे
अजय मुंडे यांनी पुढे म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्यासारखे नेतृत्व तयार व्हायला 20 वर्ष लागले. काहीही चूक नसताना त्यांची बदनाम केली जात आहे. सध्या आमच्या घराचा काम सुरू आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची आई गावी राहतात. गावाला जाऊन राहणं गुन्हा आहे का? असा सवालही अजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत, हे आम्हाला माहीत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या हा धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सुरेश धस यांना खोक्या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणीही यावेळी अजय मुंडे यांनी केली आहे.
हेही वाचा – ''वाल्मिक कराडमुळे पंकजा मुंडेंचा पराभव''
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीचं पाहिजे – अजय मुंडे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झालीचं पाहिजे, असंही अजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच सुरेश धस यांनी आमच्या कुटुंबावर केलेले आरोप बिनबुडाचे असून याबाबत कोणीतरी काही बोलले पाहिजे, म्हणून मी आज समोर आलो आहे, असंही अजय मुंडे यावेळी म्हणाले.
हेही वाचा – दमानियांनी केलेल्या आरोपांवर धसांचे स्पष्टीकरण
नेमक काय म्हणाले होते सुरेश धस?
मागील काही दिवसांपूर्वी आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी एबीपी माझा च्या 'माझा कट्टा' वर बोलत असताना धनंजय मुंडे यांच्या आई आणि पत्नीबद्दल आरोप केले होते. सुरेश धस यांनी असे म्हटले होते की, वाल्मीक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षापासून त्यांच्या मूळ गावी विभक्त राहत आहेत. धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडच्या संपूर्ण आहारी गेले. त्यांनी संपूर्ण जबाबदाऱ्या पूर्वी घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराडवर सोपवल्या. यामुळे मुंडे यांच्या घरातील सर्व मंडळी नाराज होती, असा दावा सुरेश धस यांनी केला होता.