मविआसोबत हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्षांची नवी जुळवाजुळव सुरू झाली आहे. ओवेसींच्या एमआयएमने महाविकास आघाडीसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीची तयारी दाखवली आहे. मात्र, आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर मविआच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. […]

मविआसोबत हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्षांची नवी जुळवाजुळव सुरू झाली आहे. ओवेसींच्या एमआयएमने महाविकास आघाडीसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीची तयारी दाखवली आहे. मात्र, आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर मविआच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचे समोर आले आहे. तसेच हा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवावा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे. तसेच भाजपाला हरवायचे असेल तर एकत्र येणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नवी आघाडी करण्याची ऑफर मविआला दिली आहे.

आमच्यावर आरोप आहे की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचे आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. औरंगाबादसह राज्यातही यती करण्यास तयार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरष्ठांनी या युतीचा विचार करावा आणि माझा निरोप शरद पवारांपर्यंत पोहचवावा, असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number