पालघरमध्ये मोठ्या उत्साहात आगरी महोत्सव साजरा

पालघरमध्ये मोठ्या उत्साहात आगरी महोत्सव पार पडला आहे. पारंपरिक आगरी संस्कृतीसह आगरी खाद्यपदार्थांची ओळख व्हावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचं आयोजन आगरी समाजातील महिलांकडून करण्यात आलं होतं. महोत्सवाचं हे पहिलचं वर्ष होतं. या महोत्सवात टेंभोडे गावातील २५ महिला बचत गटातील २०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवात सांस्कृतिक […]

पालघरमध्ये मोठ्या उत्साहात आगरी महोत्सव साजरा

पालघरमध्ये मोठ्या उत्साहात आगरी महोत्सव पार पडला आहे. पारंपरिक आगरी संस्कृतीसह आगरी खाद्यपदार्थांची ओळख व्हावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाचं आयोजन आगरी समाजातील महिलांकडून करण्यात आलं होतं.

महोत्सवाचं हे पहिलचं वर्ष होतं. या महोत्सवात टेंभोडे गावातील २५ महिला बचत गटातील २०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.

या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमासह आगरी पद्धतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.

या महोत्सवात कोळंबी, पापलेट, चिकन,मटण या आणि यासरख्या अनेक मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी खव्यांनी गर्दी केली होती.

महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

महिला सक्षमीकरणाच्या मूळ उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती महिला आयोजकांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number