Jay Pawar : जय पवारांच्या कृतीनं अजितदादांची आठवण! अजान सुरु होताच तेच केलं जे याआधी दादांनी केलं होत; नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामतीतील ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत. यावेळी अजान सुरु झाल्यानंतर जय पवारांनी केलेल्या कृतीमुळे अजित पवारांची आठवण जागी झाली.

Jay Pawar : जय पवारांच्या कृतीनं अजितदादांची आठवण! अजान सुरु होताच तेच केलं जे याआधी दादांनी केलं होत; नेमकं काय घडलं?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या असून सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील ग्रामीण भागापासून प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी भावनिक वातावरणात शुभारंभ केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

याचपार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत. स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेतानाच त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरु झाले. त्यावेळी जय पवार यांनी आपलं भाषण थांबवलं. तर अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

हेही वाचा- Sunetra Pawar: बारामतीत एकीचा आव अन् पुण्यात टाकला राजकीय डाव; 14 प्रभाग समित्यांवर भाजपचा ताबा, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या हाती भोपळा

नव्हेंबर 2025 मधील एका जाहीर भाषणादरम्यान अजित पवारांनी देखील अजान सुरु झाल्यामुळे भाषण थांबवले होते, अजान पूर्ण झाल्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली होती. अजित पवारांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आज जय पवार यांची ही कृती उपस्थितांना अजितदादांची आठवण करुन देणारी ठरली. दरम्यान, गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं संवाद साधताना जय पवार हे अजितदादाच्या आठवणीत भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number