Bala Nandgaonkar On KDMC MNS-Shivsena Yuti : कल्याणमध्ये मनसे-शिंदेसेनेची युती; बाळा नांदगावकर यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत. अशातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 

Bala Nandgaonkar On KDMC MNS-Shivsena Yuti : कल्याणमध्ये मनसे-शिंदेसेनेची युती; बाळा नांदगावकर यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. बुधवारी कोकण भवन येथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची गट नोंदणी पार पडली. या नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीसोबतच 'मनसे' सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 53 नगरसेवकांनी अधिकृत गट नोंदणी केली. मनसेच्या 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे 'नॉट रिचेबल' असलेले 4 पैकी 2 नगरसेवक मनसेच्या माध्यमातून या आघाडीत सामील होण्याची दाट शक्यता आहे. अशातच मनसे नेत्यांकडून यासर्व प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली जात आहे. अशातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Anil Parab UNCUT: मनसे आणि शिवसेनेची युती ते मुंबईतील गटफूटी; अनिल परब चांगलेच संतापले
शिंदेसेनेवर दबाव टाकून वाटाघाटीत बाजी मारण्याचे प्रयत्न भाजपचे होते. मात्र मनसेने शिंदेसेनेचे हात बळकट केल्यामुळे भाजपचा हिरमोड झाला आहे. स्थानिक राजकारण वेगवेगळी वळणे घेत असताना मनसेची याला मूकसंमती असल्याचे दिसते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्थानिक पातळीवर असे निर्णय घेतले जातात, असे सांगून एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या युतीला पक्षाची काही हरकत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. तसेच स्थानिक पातळीवर तडजोडी होतात, कराव्या लागतात, असे ते म्हणाले. तसेच मनसेने एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर आमचे माजी आमदार राजू पाटील यांनी तसा निर्णय घेतला आहे. काही वेळा पक्ष म्हणून तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. स्थानिक पातळीवर अशा युती आघाडी होत असतात. महापालिका निवडणुकीत ज्या पक्षावर प्रखर टीका केली, त्यांच्या धोरणांची चिरफाड केली, त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाकडून पक्षशिस्त भंगाची कारवाई होणार आहे का? असे विचारले असता, हा सर्वस्वी पक्षप्रमुखांचा निर्णय आहे, असे नांदगावकर म्हणाले.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number