Eknath Shinde Ravindra Chavan : महायुतीत ठरलं..! उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी केली मोठी घोषणा

दिल्ली दौऱ्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात महापालिका निवडणूक युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक शिंदेंच्या निवासस्थानी झाल्याची माहिती आहे.

Eknath Shinde Ravindra Chavan : महायुतीत ठरलं..! उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी केली मोठी घोषणा

कालच्या दिल्ली दौऱ्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात महापालिका निवडणूक युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ही बैठक शिंदेंच्या नागपुरातील निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर झाल्याची माहिती आहे. यादरम्यान युती संदर्भात नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेल होत. 

हेही वाचा- Supreme Court: ‘न्यायालय म्हणजे सर्कस नाही’ सूर्य कांत यांनी कठोर शब्दांत व्यक्त केली नाराजी, नेमकं कारण काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रवींद्र चव्हाण यांच्यातील बैठकीत आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी चर्चा सुरू होणार असून दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करणार असे सांगण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. 

हेही वाचा- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील धक्कादायक घोटाळा उघड झाल्यानंतर अदिती तटकरे यांची मोठी घोषणा! आता ‘या’ लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणार

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, “सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमची एक बैठक झाली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे गेलो, उर्वरित निवडणुका, त्याबाबत रणनीतीवर आमची चर्चा झाली. या बैठकीसोबतच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबतही सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. 29 महापालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता असुन त्याबद्दल देखील चर्चा झाली “.

हेही वाचा- Shivraj Patil: भारतीय संसदेत अमीट ठसा उमटवणारे शिवराज पाटील चाकूरकर काळाच्या पडद्याआड

“तसेच महापालिका निवडणुका महापालिका म्हणून लढण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्यात चर्चा झाली असून मुंबईसह महत्त्वाच्या नेत्यांमध्ये युती व्हावी अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. इतर ठिकाणी समिती स्थापन करून युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्याचं या चर्चेदरम्यान ठरलं आहे. काल एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी याबाबत आमची बैठक झाली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने महायुती म्हणून पुढे जाण्याच्या दृष्टीने निवडणुका लढवण्याचं ठरवलं आहे. तसेच मुंबई व प्रमुख महापालिका महायुती म्हणूनच लढणार अशी घोषणा यावेळी भआजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी केली.” 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number