Sharad Pawar : अजित दादांच्या निधनाने कोलमडून गेलेले शरद पवार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 40 वर्षांनी बारामतीची सूत्रं पुन्हा हाती

अतिशय भावूक होऊन अजितदादांच्या अस्थी नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या.  यानंतर तब्बल 40 वर्षानंतर शरद पवार बारामतीत पुन्हा सक्रिय झाले आहे.

Sharad Pawar : अजित दादांच्या निधनाने कोलमडून गेलेले शरद पवार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 40 वर्षांनी बारामतीची सूत्रं पुन्हा हाती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने राज्यासह देशात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार, 29 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आज, 30 जानेवारी रोजी सकाळी त्यांचे अस्थी संकलन केल्यानंतर दुपारी बारामतीतील नीरा नदीमध्ये हे अस्थी विसर्जन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, दोन्ही मुलं पार्थ आणि जय, त्यांची सून, अजितदादाचे बंधू, बहिण सुप्रिया सुळे, पुतणे युगेंद्र पवार आणि इतर कुटुंबिय बोटीत उपस्थित होते. अतिशय भावूक होऊन अजितदादांच्या अस्थी नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या. 

हेही वाचा- Ajit Pawar Death : पवार कुटुंबियांसाठी कठीण क्षण! जड अंतःकरणाने केलं बारामतीत अजितदादांच्या अस्थीचं नीरा नदीत विसर्जन
यानंतर तब्बल 40 वर्षानंतर शरद पवार बारामतीत पुन्हा सक्रिय झाले आहे. ज्या नदीत अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले, त्या नदीची पाहणी शरद पवारांनी केली. यामुळे बारामती आणि शरद पवार हे जुनं नातं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. मात्र, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवारांनी पुन्हा बारामतीची सूत्रे स्वतःच्या हाती घेतल्याचे दिसून येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number