BJP Vidhan Parishad Candidate : विधानपरिषदेची यादी जाहीर झाल्यानंतर केशव उपाध्येंचं ट्विट चर्चेत, ‘सतरंजी उचल्या’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सचा घेतला समाचार

मुंबई : विधान परिषदेसाठी विविध पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने देखील अंबादास दानवे या एका नावाची घोषणा नुकतीच केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर पक्षातील नेत्या सुषमा अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजप नेते केशव उपाध्ये यांनीही आज एक पोस्ट केल्याने त्यातून […]

BJP Vidhan Parishad Candidate : विधानपरिषदेची यादी जाहीर झाल्यानंतर केशव उपाध्येंचं ट्विट चर्चेत, ‘सतरंजी उचल्या’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सचा घेतला समाचार

मुंबई : विधान परिषदेसाठी विविध पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने देखील अंबादास दानवे या एका नावाची घोषणा नुकतीच केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर पक्षातील नेत्या सुषमा अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजप नेते केशव उपाध्ये यांनीही आज एक पोस्ट केल्याने त्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. यात उमेदवारीसंबंधीचा कोणताही संदर्भ नसला तरी केशव उपाध्ये यांची अगतिकता यातून व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : Navnath Ban Tweet: ‘तुम्हाला कुर्बाणीसोबतच निष्ठा सिद्ध…’; सुषमा अंधारेंच्या स्टेटसनंतर नवनाथ बन यांचा खोचक टोला

केशव उपाध्ये यांची एक्स पोस्ट –

की घेतले न हे व्रत अंधतेने…”

२५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली… आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही.

ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो… अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या…

“संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…”

हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे.

परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेन्डे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

बाकी… मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा!

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number