मुंबई : शिवसेना ठाकरे गटावर इतका मोठा आघात केल्यानंतर आता ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडे मोर्चा वळवला जाणार आहे. ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत 2022 ला 40 आमदारांसह शिवसेना फुटली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र शिवसेना स्थापन केली. तसेच भाजपसोबत युती करून शिंदे गट सत्तेत सामील झाली. तसेच आता चार वर्षांनी पुन्हा एकदा ऑपरेशन 2.0 राबवत ठाकरे गटातील 6 खासदारांना फोडून पुन्हा शिंदे गटाने आपली ताकद वाढवली. परंतू, धक्कादायक बाब म्हणजे येत्या डिसेंबर 2026 पर्यंत ऑपरेशन टायगर पूर्णत्वास आणले जाणार असून आता ठाकरे गटाचे 45 नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार असल्याचे समजते. त्यामुळे आता ऑपरेशन 3.0 राबवले जाणार असल्याची रोजदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरेंच्या नगरसेवकांच्या मनातील खदखद शिंदेंच्या शिवसेनेने ओळखून नगरसेवक आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.