Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या अपघाताचं गुढ उलगडणार; अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स फॉरेन्सिक टीमच्या हाती

अजित पवार यांच्या झालेल्या अपघातानंतर फॉरेन्सिक टीमला अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून मोठी अपडेट समोर आली आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या अपघाताचं गुढ उलगडणार; अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स फॉरेन्सिक टीमच्या हाती

महाराष्ट्राचे वित्त मंत्री, बीड आणि पुण्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाचा डोंगर कोसळला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तसेच गावकऱ्यांकडून टाहो फोडला जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा- Ajit Pawar Death : 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस…, अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर
यावेळी अजित पवार यांचा मृत्यू विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान या अपघातानंतर महत्त्वाचा पुरावा हा विमानाचा ब्लॅक बॉक्स होता. जो सापडण अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता. घडलेल्या अपघाताचं मूळ कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? पायलटची चूक होती का? हवामान कारणीभूत होतं का? एखादा सिस्टीम फेल झाला का? या सर्वांची माहिती ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून मिळवता येते. दरम्यान अजित पवार यांच्या झालेल्या अपघातानंतर अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे. या विमान अपघातामध्ये सर्वजण म्हणजे, पाचही जण मृत्यूमुखी पडल्यामुळे ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून या अपघाताचा तपास करता येणं शक्य आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number