या मंदिराचे ४२ वर्षांनी उघडणार दार

जैन बांधवांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन या ठिकाणी असलेले अंतरिक्ष पार्शवनाथ मंदिर खुले होणार असल्याने जैन बांधवांकडून या ठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे. शीरपूर जैन येथील शेकडो वर्षांपूर्वीचे जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्शवनाथ मंदिर हे २२ एप्रिल १९८१ पासून पूजा आणि दर्शनासाठी न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. मंदिर खुले करण्यात यावे या संदर्भात सर्वोच […]

या मंदिराचे ४२ वर्षांनी उघडणार दार

जैन बांधवांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन या ठिकाणी असलेले अंतरिक्ष पार्शवनाथ मंदिर खुले होणार असल्याने जैन बांधवांकडून या ठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे. शीरपूर जैन येथील शेकडो वर्षांपूर्वीचे जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्शवनाथ मंदिर हे २२ एप्रिल १९८१ पासून पूजा आणि दर्शनासाठी न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. मंदिर खुले करण्यात यावे या संदर्भात सर्वोच नायलयात वाद सुरू होता.

या वादामुळे २२ एप्रिल १९८१ ला या मंदिराला कुलूप लागले होते. तेव्हापासून सामान्य भक्तांना छोट्या झरोक्यातून अंतरिक्ष पार्श्वनाथाचे दर्शन घ्यावे लागत आहे. पूर्वी कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर एक गट त्या विरोधात वरिष्ठ कोर्टात अपील करीत होता. अखेर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. तिथेही कित्येक वर्षांपासून निकाल होत नव्हता. आता मात्र २२ फेब्रुवारीला मंदिराचे दरवाजे उघडून सूचनेनुसार अंतरिक्ष पार्शनाथाच्या मूर्तीला लेप करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. या निकालाची माहिती शिरपूर जैन येथे पोहोचतात जैन समुदायाच्या वतीने मोठा आनंद व्यक्त करुन पेढे वाटण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number