देशात डॉक्टर सुरक्षित नव्हते. आज वकील ही सुरक्षित नाही, असेच समजून येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार नवनवीन कायदे तयार करते. परंतु तरीही अशा मारहाणीच्या घटना वाढत आहेत.
एका वकिलाला न्यायालयाच्या आवारातच एका महिलेकडून आणि तिच्या साथीदार महिलेकडून मारहाण करण्यात आली आहे.
भिवंडी न्यायालयात महिलेकडून वकिलाला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचं कारण समजू शकलेलं नाही. भिवंडी वकिलांकडून या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे.
या मारहाणी विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात मारहाण झालेला वकील गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहेत. ही मारहाण पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याच समजत आहे.