मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस येथे दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगांसाठी काही कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्यांच्या या करारांबाबत अॅड. असीम सरोदे यांनी एक्स पोस्टद्वारे सूचक वक्यव्य केले आहे. असीम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून ही गुंतवणूक, करार याबाबत तटस्थपणे अर्थशास्त्र अभ्यासकाने लिहावे, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच मुंबईत राहणाऱ्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुलासोबत मुख्यमंत्री दावोसमध्ये जाऊन करारा करतात, हेच ते मुंबई, महाराष्ट्रात करू शकले असते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ही केवळ जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची खोचक टीकादेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
काय म्हणाले अॅड. असीम सरोदे,
सरकार कुणाचेही असो…. पण दावोस आणि गुंतवणूक करार …. या वाढीव प्रकाराबद्दल कुणीतरी तटस्थ अर्थशास्त्र अभ्यासकाने लिहावे.
म्हणजे मला हे कळत नाही की मंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा याचा मुलगा अभिषेख लोढा याने मुख्यमंत्री फडणवीस याच्या कंपनीसोबत महाराष्ट्रात डेटा सेंटर उभारण्याबाबतचा करार दावोसमध्ये जाऊन का केला? ते दोघेही तर महाराष्ट्रात असतात.
आपल्या जनतेच्या पैशांचा गैरवापर आणि उधळपट्टी सुरु आहे का?
सरकार कुणाचेही असो…. पण दावोस आणि गुंतवणूक करार …. या वाढीव प्रकाराबद्दल कुणीतरी तटस्थ अर्थशास्त्र अभ्यासकाने लिहावे. म्हणजे मला हे कळत नाही कि मंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा याचा मुलगा अभिषेख लोढा याने मुख्यमंत्री फडणवीस याच्या कंपनीसोबत महाराष्ट्रात डेटा सेंटर… — Asim Sarode (@AsimSarode) January 21, 2026