‘आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील’

सद्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात तर एकपाठोपाठ एक नेते ठाकरे गटाला राम राम ठोकताय. त्यातच आता आदित्य ठाकरे ही शिवसेना सोडणार या चर्चेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

‘आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील’

महाराष्ट्र: सद्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात तर एकपाठोपाठ एक नेते ठाकरे गटाला राम राम ठोकताय. त्यातच आता आदित्य ठाकरे ही शिवसेना सोडणार या चर्चेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. आधीच अनेकांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी चांगलीच वाढलीय. त्यातच आता आदित्य ही ठाकरे गट सोडणार असं वक्तव्य एका बड्या नेत्याने केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतंय. माजी आमदार शहाजी पाटील यांनी या संदर्भात वक्तव्य केले असून त्यांचं वक्तव्य आता कितपत खरं ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 

हेही वाचा: Maharashtra Weather :महाराष्ट्रात उष्णतेचा चढला पारा, 24 तासांत वाढणार तापमान; काय काळजी घ्याल?

काय म्हणाले शहाजी पाटील? 
एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील, असे भाकीत शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी केले आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश‌ करत आहेत तर आणखी काही नेते वाटेवर आहेत. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवर माजी आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे पिता- पुत्रामध्येच फूट पडेल असं वक्तव्य केलं आहे.

अनेक विरोधी पक्षातील नेते आणि आमदाराच्या चौकशी झाल्या म्हणून त्यांनी पक्ष सोडला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती अशी झाली आहे. तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी भावना त्यांच्या नेत्यात झाली आहे. त्यामुळे एक दिवस असा उगवेल की उद्धव साहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटेच राहण्याची परिस्थिती येऊ शकते, असे ही पाटील यांनी म्हटले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number