Aaditya Thackeray : ‘जवळीक वाढत असेल तर यांच्या पोटात का दुखतंय’; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला, मुख्यमंत्र्यांना साधलेल्या संपर्कावरून चर्चा रंगली

आमदार आदित्य ठाकरे तसेच नेता मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता.

Aaditya Thackeray : ‘जवळीक वाढत असेल तर यांच्या पोटात का दुखतंय’; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला, मुख्यमंत्र्यांना साधलेल्या संपर्कावरून चर्चा रंगली

मुंबई : मुंबई महापालिकेतील सुधार समितीमधील एका प्रस्तावाच्या संदर्भात नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तसेच नेता मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलतं त्या प्रस्तावांना स्थगिती दिली होती. त्यामुळे मातोश्री आणि फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा जवळीक वाढली आहे का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. शिवाय या संपर्कांमुळे शिंदे गट मात्र अस्वस्थ झाले असल्याचेही बोलले जात होते. याविषयी आज, शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी प्रसाद माध्यमांशी संवाद साधताना आपले मत मांडले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जर ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जवळीक वाढत असेल तर त्यांच्या पोटात का दुखतंय, हा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच दरे गाव आणि दिल्ली वाऱ्या का वाढत आहेत, असा सवालही एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा : NCP Sunetra Pawar: भाजपच्या नकारामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठा पेच; राज्यसभेच्या एका जागेमुळे मोठे फेरबदल होणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number