ठाणे शहरात अतिरिक्त अडीच हजार खाटांची व्यवस्था

ठाणे शहरात दररोज सरासरी एक हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडण्याची भीती व्यक्त केली जात असून महापालिका प्रशासनाने तीन नव्या कोरोना रुग्णालयांच्या माध्यमातून अडीच हजार खाटा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या रुग्णालयांची पाहणी करून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. पालकमंत्री एकनाथ […]

ठाणे शहरात अतिरिक्त अडीच हजार खाटांची व्यवस्था

ठाणे शहरात दररोज सरासरी एक हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडण्याची भीती व्यक्त केली जात असून महापालिका प्रशासनाने तीन नव्या कोरोना रुग्णालयांच्या माध्यमातून अडीच हजार खाटा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या रुग्णालयांची पाहणी करून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी पालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी पुन्हा पूर्ण क्षमतेने सज्ज होण्याचे आदेश दिले होते. खाटा उपलब्ध नाही आणि रुग्णवाहिका मिळत नाही, अशा तक्रारी येऊ नयेत, यासाठी योग्य नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर नवीन तीन रुग्णालये तातडीने रुग्णसेवेत दाखल करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवर एक हजार खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले असून तेसुद्धा रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ज्युपिटर रुग्णालयाजवळील पार्किंग प्लाझा येथे ११६९ खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले असून त्याचा अंशत: वापरही सुरू झाला आहे.

सद्य:स्थितीत या ठिकाणी ३५० खाटांचा वापर सुरू आहे. मनुष्यबळ वाढवून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आणि या ठिकाणी आणखी किमान ५०० खाटा वाढवण्यासाठी नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. प्राणवायू असलेल्या खाटांना प्राणवायूचा पुरवठा अव्याहत होईल, याची खबरदारी घ्यावी. रुग्णालये तसेच विलगीकरण कक्षामध्ये जेवणासंबंधी किंवा गैरसोयीच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नये. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा. प्रत्येक रुग्णाचा जीव महत्त्वाचा असून रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाला तिष्ठत राहावे लागू नये. त्याच्यावर तातडीने उपचार होण्याची गरज असून पहिल्या टप्प्यात महापालिकेने ज्या कार्यक्षमतेने काम केले, त्याहीपेक्षा अधिक सजगपणे काम करण्याची गरज आहे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number