सीरम इंन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांचं स्पष्टीकरण; लसीचा तुटवडा या महिन्यापर्यंत जाणवेल

मुंबई : देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीती वाढली आहे. ऑक्सिजन आणि बेडच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशात भयावह स्थिती झाली आहे. जानेवारी फेब्रुवारीत कमी झालेला विषाणूने पुन्हा रौद्र रुप धारण केले आहे. कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. मात्र अनेक राज्यात आणि जिल्ह्यात लसीचा […]

सीरम इंन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांचं स्पष्टीकरण; लसीचा तुटवडा या महिन्यापर्यंत जाणवेल

मुंबई : देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीती वाढली आहे. ऑक्सिजन आणि बेडच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशात भयावह स्थिती झाली आहे. जानेवारी फेब्रुवारीत कमी झालेला विषाणूने पुन्हा रौद्र रुप धारण केले आहे. कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. मात्र अनेक राज्यात आणि जिल्ह्यात लसीचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

कोरोना रोखण्यासाठी देशातील तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण खुले करण्यात आले आहे. लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची गती कमी करण्यात आले असून काही ठिकाणी लसीकरण हे थांबविण्यात आले होते. तसेच सीरम इंन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. जुलैपर्यंत देशात लसीचा तुटवडा असेल असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाची लस कोविडशिल्डची निर्मिती करणारी एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील लसीकरणाची गरज भागवण्यासाठी 60 ते 70 मिलियन डोसेस पासून ते 100 मिलियन डोसेची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी जुलैपर्यंतचा वेळ जाऊ शकतो. सरकारने 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण खुले केल्यानं लसींचा तुटवडा भासत आहे. असे पुनावाला यांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number