मुंबई, २९ मे २०२३ , प्रतिनिधी : रविवारी (२८ मे रोजी ) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचा थाटामाटात उद्घाटन केलं. त्याचवेळी दुसरीकडे नवी दिल्लीत कुस्तीपटूंच्या आंदोलनानं अधिक आक्रमक रूप घेतलं. यामुळे पोलिसांनीं या आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. ते फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समाज माध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कुस्तीपटूंसाठी अभिनेत्री वनिता खरात पुढे सरसावली आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी सामायिक करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या या स्टोरीत वनितानं दिल्ली पोलिस आणि कुस्तीपटूंच्या झटापटीचे फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. ही स्टोरी शेअर करताना तिने दु:ख आणि निःशब्द भावना व्यक्त करणारे इमोजीही पोस्ट केले आहेत.